छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसाचा विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – स्‍पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्‍या विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाने बलात्‍कार केल्‍याची घटना येथे घडली आहे. शुभम गोसटकर (रा. आडुळ, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. तो धुळे कारागृहात पोलीस अंमलदार म्‍हणून कार्यरत आहे. त्‍याच्‍यावर छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसमवेतच्‍या ओळखीचा गैरलाभ घेऊन तिच्‍यावर वारंवार बलात्‍कार केला. यासाठी त्‍याने विवाहाचे खोटे आमीषही दाखवले होते; पण नोकरी लागल्‍यानंतर त्‍याने दुसर्‍याच एका तरुणीसमवेत प्रेमप्रकरण चालू केले. ही गोष्‍ट लक्षात येताच पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाणे गाठून आरोपीच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली.

संपादकीय भूमिका

पोलीस लोकांच्‍या रक्षणासाठी असतांना त्‍यांनी असे हीन कृत्‍य करणे लज्‍जास्‍पद आहे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्‍हणता येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करणे आवश्‍यक !