पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चा संचालक विनय अरहाना यास अटक !
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण !
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी ‘रोझरी स्कूल’चा संचालक विनय अरहाना याला अटक केली. अरहाना याने ललितला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साहाय्य केल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. एका अधिकोषातून (बँकेतून) घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणामध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) काही मासांपूर्वी अरहाना याला अटक केली होती. तो सध्या तळोजा कारागृहात आहे. तेथूनच त्याला पुणे पोलिसांनी कह्यात घेतले आहे. अरहाना याचा गाडीचालक दत्ता डोके याने ललितला ससूनमधून पसार झाल्यानंतर गाडीतून बाहेर सोडले होते, तसेच त्याच्याकडून १० सहस्र रुपये घेतले होते.