तुमच्यावर आक्रमण झाले असते, तर तुम्ही आमच्यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते ! – इस्रायल
हमासचा निषेध करणार्या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !
न्यूयॉर्क (अमेरिका) – आम्ही इस्रायलमध्ये आमच्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत. तुमच्यापैकी कुणाच्याही देशात असे हत्याकांड झाले असते, तर मला निश्चिती आहे की, तुम्ही इस्रायलपेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते, अशा शब्दांत इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया, चीन, संयुक्त अरब अमिरात या देशांना फटकारले. अमेरिकेने सुरक्षा परिषदेत हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करणारा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला १० देशांनी पाठिंबा दिला, तर वरील ३ देशांनी विरोधात मतदान केले. त्यावरून इस्रायलच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूताने या देशांना वरील शब्दांत फटकारले.
בדיון היום במועצת הבטחון סיפרתי לחברות המועצה על הוריי שגרים באשקלון ורצים למקלט עשרות פעמים בכל יום. הסברתי שאני בטוח שכל מדינה אחרת שהייתה חווה טבח דומה, הייתה מפעילה כוח רב יותר מישראל ויוצאת למבצע צבאי רחב כדי להשמיד את האויב. אז מדוע כשישראל מגינה על עצמה יש מדינות צבועות… pic.twitter.com/zq5uDa8Vss
— Ambassador Gilad Erdan גלעד ארדן (@giladerdan1) October 26, 2023
इस्रायलच्या राजदूताने म्हटले की, हमासने अत्यंत अमानवीय कृत्य केले आहे. असे अत्याचार पुन्हा होऊ नयेत; म्हणून या आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर सैन्य कारवाई व्हायला हवी, याविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका असायला नको.
संपादकीय भूमिका
|