नवी मुंबईत नवरात्रोत्सव मंडळाच्या दानपेटीतून ४ सहस्र रुपयांची चोरी !
कोपरखैरणे (नवी मुंबई) – येथे एका नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून त्यातील ४ सहस्र रुपये चोरण्यात आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. अद्याप चोराला पकडण्यात आलेले नाही. सकाळी ६ वाजता ही चोरी करण्यात आली. (मंडळात दानपेटी ठेवलेली असतांना तेथे सुरक्षा ठेवण्यात आली होती का ? – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिकाचोरट्यांना पोलिसांचे जराही भय उरले नसल्याचे सिद्ध करणारी घटना ! |