नागपूर येथे अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश मिळवावा ! – मुजीब पठाण, प्रदेश काँग्रेस महासचिव
प्रदेश काँग्रेसच्या महासचिवांची मागणी !
नागपूर – येथील बुटीबोरी परिसरात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. युवक त्याच्या आहारी जात आहेत. यामुळे भावी पिढी नष्ट होऊ शकते. हे लक्षात घेऊन यावर अंकुश मिळवावा आणि संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे महासचिव मुजीब पठाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधिकार्यांना निवेदन दिले.
‘काही दिवसांपासून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी एम्.डी. पावडर, गांजा, प्रतिबंधित तंबाखू, विदेशी सिगारेट यांच्या अधीन गेल्याचे दिसून येते. काही ठिकाणी व्यसनाधीन लोकांचे वास्तव्य अधिक आहे. त्यामुळे तेथून जाणे महिला किंवा मुली यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना पोलिसांनी आळा घालावा’, अशी मागणी मुजीब पठाण यांनी केली आहे. (हे पोलिसांना सांगावे का लागते ? पोलीस स्वतःहून तस्करी करणार्यांवर कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिका ‘काँग्रेसने इतकी वर्षे भारतावर राज्य करूनही तिने भारताला अमली पदार्थांच्या विळख्यातून का सोडवले नाही ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे ! |