आई-वडिलांची सेवा केवळ नैतिक नाही, तर कायदेशीर कर्तव्यही आहे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – भारत ही श्रवण कुमार यांची भूमी आहे. वृद्धांची देखभाल करणे, हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. केवळ नैतिकच नाही, तर त्याला कायद्याचेही बंधन आहे. ते कर्तव्यही आहे. मुलांनी वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे, हे पितृऋण फेडण्यासाठी आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने ८५ वर्षीय छवीनाथ यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले. छवीनाथ यांना त्यांच्या मुलांकडून वाईट वागणूक देण्यासह त्यांना संपत्तीतून बेकायदेशीरित्या वगळले आहे. यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले की, वृद्धपणात लोक केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक त्रासांविरुद्धही लढत असतात. नेहमीच असे पहाण्यात येते की, संपत्ती मिळाल्यानंतर मुले आई-वडिलांना निराधार करतात. हे चुकीचे आहे. मुलांनी श्रवण कुमारसारखे बनले पाहिजे.