नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पुढार्यांना गावबंदी !
मराठा आरक्षणाचे प्रकरण
नाशिक – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी दिलेली मुदत संपूनही राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
राज्यात पुढार्यांना गावबंदी करण्याचे आवाहन त्यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर पुढार्यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत.