सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ‘हेट स्पीच’ प्रकरणी तक्रार प्रविष्ट !
(‘हेट स्पीच’ म्हणजे द्वेषपूर्ण वक्तव्य करणे)
‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य करणे) प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी तक्रार मिरज, विटा, ईश्वरपूर, पलूस, तासगाव येथील पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करण्यात आली. त्याविषयीचा थोडक्यात वृत्तांत देत आहोत.
विटा
येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ही तक्रार स्वीकारली. या वेळी सिंहसेनेचे संस्थापक श्री. शिवसाहेब शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दत्तात्रय गायकवाड, प्रशांत सुतार, भगवान ढमाले, विजय चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम, श्रीमान हिंदवी प्रतिष्ठानचे श्री. रणजित मोहिते यांच्यासह सौ. जयश्री वेदपाठक, सौ. शोभा म्हेत्रे, सौ. अलका रोकडे, सौ. वीणा कदम आणि सौ. निर्मला ढवण उपस्थित होत्या.
ईश्वरपूर
येथे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री शरद नाइकवडी, अविनाश जाधव, धर्मप्रेमी सर्वश्री प्रवीण पाटील, नीलेश जाधव, संजय पाटील, शिवप्रसाद जंगम (स्वामी), अजित जाधव, अमित पाटील, सेवानिवृत्त नाईक फौजी बजरंग कुंभार, युवा उद्योजक दीपक पाटील, उद्योजक श्री. रमेश गोंदकर (काका), श्री. सुधीर कुलकर्णी आदी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अशोक म्हसकर (अप्पा), भरत जैन आदी उपस्थित होते.
पलूस
येथील पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्याकडे तक्रार देण्यात आली. या वेळी अधिवक्ता अविनाश युवराज वडार, श्री. शरद पाटील आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
तासगाव
येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री राजेश फडतरे (जुळेवाडी), अजित सावंत, शशिकांत कोळी (दोघे रा. बस्तावडे) आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.