सातारा येथे राजघराण्याचा दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !

सातारा, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका) येथे मोठ्या उत्साहात दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. जलमंदिर पॅलेस येथे भवानी तलवारीस पोलीस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जलमंदिर ते शिवतीर्थापर्यंत राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट, ढोल-ताशा पथक यांचा समावेश होता. शिवतीर्थ येथे मिरवणूक आल्यानंतर श्री भवानी तलवारीची आरती करण्यात आली. या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्हाधिकारी, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते