श्रीसत्शक्ति बिंदामाते, तुझे सदैव लक्ष असो आम्हावरी ।
‘जानेवारी २०२३ मध्ये काही दिवस श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा मला सुचलेले काव्य येथे दिले आहे.
श्रीसत्शक्ति बिंदामाते,
जागोजागी या तुझ्याच ग पाऊलखुणा (टीप १) ।
मार्गक्रमण करण्या त्यावरूनी जीव हा पडतो उणा ॥ १ ॥
परतुनी येशील ना ग लवकर माघारी ।
आतुरली बघ सारी रामनाथी नगरी (टीप २)॥ २ ॥
स्थूल सहवास तुझा देई आम्हा ऊर्जा ।
मनामनात जागवी नवचेतना ॥ ३ ॥
सूक्ष्मरूपे तू इथेच असशी ।
वात्सल्यभावे आम्हाकडे पहाशी ॥ ४ ॥
उद्धार करण्या आमुचा कधी तू मारक रूपे (टीप ३) प्रकटशी ।
सदैव लक्ष तुझे असो आम्हावरी ॥ ५ ॥
कृतज्ञताभाव दाटला अंतरी ।
श्रीसत्शक्ति बिंदामाते, तुझी आठवण येते भारी’ ॥ ६ ॥
टीप १ – साधनेचे दिशादर्शन
टीप २ – रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधक
टीप ३ – ‘साधक साधनेत पुढे जावेत’, या हेतूने त्यांना चुका सांगणे
– सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |