‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सांगणे त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून सत्यात उतरले’, याची साधकाला आलेली प्रचीती !
१. श्री. मुकुंद जाखोटिया आणि त्यांच्या पत्नी यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना श्री भद्रकालीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर घरी येण्याची विनंती करणे अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘दर्शन झाल्यावर पाहू’, असे सांगणे
‘नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत आम्ही भाग्यनगर (हैद्राबाद) येथे दौर्यावर होतो. त्या वेळी आम्ही वारंगल (तेलंगाणा) येथील श्री भद्रकालीदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. मूळचे सांगली येथील आता वारंगल येथे स्थायिक झालेलेे साधक श्री. मुकुंद जाखोटिया त्यांच्या पत्नी समवेत आम्हाला देवीच्या दर्शनाला घेऊन जाणार होते. श्री. आणि सौ. जाखोटिया यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर घरी येण्याची विनंती केली. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘दर्शन झाल्यावर पाहू. ‘तेथे किती वेळ लागेल ?’, याची निश्चिती नाही.’’
२. त्या गावातील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटायला आले होते. त्या सर्वांशी बोलण्यात बराच वेळ गेला. आमच्या पुढील प्रवासासाठी अधिक वेळ लागणार होता. त्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री. आणि सौ. जाखोटिया यांना मंदिरातच आश्रमातील प्रसाद दिला.
३. मंदिरातून बाहेर पडल्यावर गाडीने प्रवास करतांना अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘श्री. जाखोटिया यांच्या घरी जाऊया’, असे सांगणे
तेथील सर्व आवरून झाल्यावर आम्ही आमच्या चारचाकी गाडीत बसलो. श्री. आणि सौ. जाखोटिया दोघेही त्यांच्या चारचाकी गाडीत बसले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचे श्री. जाखोटिया यांच्या घरी जाण्याचे रहित झाले होते. आम्ही पुढे आल्यानंतर मार्गात एक चौक येण्याच्या आधी अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आपण श्री. जाखोटिया यांच्या घरी जाऊया.’’ त्यांचे बोलणे ऐकून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. नंतर आम्ही श्री. जाखोटिया यांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ तुमच्या घरी येणार आहेत. तुम्ही तुमची गाडी पुढे ठेवा. आम्ही तुमच्या गाडीच्या मागून येतो.’’ नंतर त्यांनी त्यांची गाडी आमच्या गाडीच्या पुढे घेतली. आम्ही ज्या चौकाच्या आधी थांबलो होतो, त्या चौकापासून श्री. जाखोटिया यांच्या घराकडे जाण्यासाठी मार्ग होता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्या चौकाच्या काही अंतर आधी श्री. जाखोटिया यांच्याकडे जाण्याचा विषय काढला होता.
४.‘प.पू. डॉक्टरांनी श्री. मुकुंद जाखोटिया यांना ‘तुझे स्वतःचे घर होईल, त्या वेळी मी त्या घरी निश्चित येईन’, असे सांगितले असणे आणि त्याची पूर्तता श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चरण घराला लागल्याने झाली अन् त्यांच्या माध्यमातून साक्षात् गुरुदेव आले’, असे श्री. जाखोटिया यांनी सांगणे
आम्ही श्री. आणि सौ. जाखोटिया यांच्या घरी गेल्यावर त्यांनी सर्वांना अल्पाहार दिला. श्री. जाखोटिया यांना एवढा आनंद झाला होता की, ‘त्यांना काय करू !’, असे झाले होते. सर्वांशी बोलल्यावर श्री. जाखोटिया यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि त्यांची भावजागृती झाली. त्यांनी सांगितले, ‘‘मी सांगली येथे असतांना वर्ष १९९८ ते २००० या कालावधीत माझी प.पू. गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) भेट झाली. त्या वेळी माझ्या घरच्या अडचणीमुळे मला निवासाची अडचण होती. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मला साधकांकडून निरोप पाठवला, ‘तुला काही अडचण असल्यास सांग. आपण सर्व सोय करू.’ त्यानंतर त्यांनी माझी सर्व सोय केली. एकदा प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘‘ज्या वेळी तुझे घर होईल, त्या वेळी मी त्या घरी निश्चित येईन.’’ पुढे काही कालावधीनंतर मी नोकरीनिमित्त मुंबई येथे गेलो. पुढे मी व्यवसाय चालू केला आणि तेलंगाणा राज्यातील वारंगल या ठिकाणी स्वतःचे घर घेऊन स्थायिक झालो. गुरुदेवांनी त्या वेळी जे शब्द दिले होते, त्याची पूर्तता आज श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चरण घराला लागल्याने झाली. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ प.पू. गुरुदेवांचे रूप आहेत. आमच्या घरी आज साक्षात् प.पू. गुरुदेवच आले आहेत.’’ ते असे सांगत असतांना त्यांची पुष्कळ भावजागृती होत होती.
५. ‘गुरूंनी दिलेले शब्द ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून पूर्ण करतात’, हे अनुभवता येणे
त्यांचे बोलणे ऐकून आम्हा सर्वांना प.पू. गुरुदेव आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती. प.पू. गुरुदेवांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्थुलातून कुठे जाणे शक्य नाही. ‘प.पू. गुरुदेवांनी दिलेल्या शब्दांचे पालन त्यांच्या शिष्याने पूर्ण केले’, हे पहाण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘गुरूंनी दिलेला शब्द कधीही वाया जात नाही. आपण श्रद्धेने साधना करायची. गुरु त्यांचे बोलणे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून पूर्ण करतात.’
६. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘गुरुदेवांनी श्री. जाखोटिया यांच्या घरी जाण्याचा विचार सुचवला’, असे सांगणे
श्री. जाखोटिया यांचे बोलणे ऐकून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘मला गुरुदेवांनीच तो विचार सुचवला. त्यामुळे शेवटच्या क्षणी आपण श्री. जाखोटिया यांच्या घरी आलो.’’ ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ शेवटच्या क्षणी अकस्मात् श्री. जाखोटिया यांच्या घरी जाणे’, ही गुरुदेवांची कृपा आहे’, हे लक्षात आले.
७. प्रार्थना
‘प.पू. गुरुदेव, आम्हाला तुमची कृपा अनुभवता आली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी आम्हा सर्व साधकांची श्रद्धा अशीच अखंड टिकून राहू दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (१.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |