संयुक्त राष्ट्रांत इस्राइल-हमास संघर्षावर चर्चा चालू असतांना पाकने आळवला काश्मीरचा राग !
पाकने केलेली टिप्पणी ही उत्तर देण्याच्याही पात्रतेची नाही ! – भारत
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिषदेत चर्चा चालू असतांना पाकने काश्मीरचा राग आळवल्यावर भारताने ‘आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत’, अशी भूमिका घेतली. भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र या वेळी पाकचे नाव न घेता म्हणाले की, एका प्रतिनिधी मंडळाने भारताच्या केंद्रशासित प्रदेशावर (काश्मीरवर) टिप्पणी केली गेली. हे क्षेत्र भारताचे अखंड आणि अविभाज्य अंग आहे. मी या टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करणार; कारण त्या त्याच पात्रतेच्या आहेत. वेळेची आवश्यकता पहाता मला अशा प्रतिक्रियांवर भाष्य करून ते सूत्र वाढवायचे नाही !
संपादकीय भूमिकाजिहादी पाकला संयुक्त राष्ट्रांच्या परिषदांत बाणेदार उत्तर देण्यासह आता भारताने इस्रायलसारखी ‘आर-पारची लढाई’ लढून संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर स्वत:च्या नियंत्रणात घ्यावा ! |