(म्हणे) ‘कोलकाता येथे दुर्गापूजा मंडळाने उभारलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती अयोग्य !’
साम्यवादी आणि भारतद्वेषी वृत्त संकेतस्थळ ‘द वायर’ ला पोटशूळ !
कोलकाता – शहरात एका दुर्गापूजा उत्सव मंडळाने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारून मंडप सजवला होता. त्याविषयी साम्यवादी आणि भारतद्वेषी वृत्तसंकेतस्थळ ‘द वायर’मध्ये पार्थो सारथी रे यांचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीराममंदिर हे समाजाच्या शोषणाचे प्रतीक आहे आणि उत्सवाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. (श्रीराममंदिर हे शोषणाचे नव्हे, तर मांगल्य, श्रद्धा आणि हिंदूंची अस्मिता यांचे प्रतीक आहे. त्याला शोषणाचे प्रतीक म्हणणारे वैचारिक आतंकवादीच होय ! – संपादक)
१. प्रतिवर्षी दुर्गापूजेच्या वेळी कोलकाता येथे अनेक भव्य मंडप उभारले जातात, ज्यामध्ये विविध देखावे असतात. या वेळी संतोष मित्र चौकात एक भव्य मंडप उभारण्यात आला होता. श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारून हा मंडप सजवला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मंडपाचे उद्घाटन करण्यात आले होते.
२. हा मंडप शहरातील लोकांसाठी मुख्य आकर्षण ठरले होते. सामान्य लोकांपासून राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांसारख्या अतीमहनीय व्यक्तीही येथे दर्शनासाठी गेले होते.
३. लेख लिहिणारे पार्थो यांना दावा केला आहे की, श्रीराममंदिर जे दुसर्या धर्माचे प्रार्थनास्थळ पाडून बांधले जात आहे, ते कोलकातामधील दुर्गापूजेच्या मंडपाच्या केंद्रस्थानी असू शकत नाही. (श्रीराममंदिर पाडून तेथे बाबराने मशीद बांधली. असे असतांना चुकीचा इतिहास सांगणार्यांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकासाम्यवादी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घाला ! |