वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी अनेक देशद्रोही संघटना कार्यरत ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन
श्री दुर्गामाता दौडीत देश-धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन !
मिरज (जिल्हा सांगली), २४ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी अनेक देशद्रोही संघटना कार्यरत आहेत. हिंदु तरुणींना फसवून आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जगातील ५२ इस्लामी राष्ट्रांतून लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य केले जात आहे. त्यामुळे हिंदूंविरोधी षड्यंत्रांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी येथे केले. २४ ऑक्टोबर या दिवशी येथील विद्यामंदिर प्रशाला येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता झाली. त्या वेळी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या’ माध्यमातून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्याभोवती वाढत असलेले अतिक्रमण आम्ही रोखले. त्याला ‘सुफी संत’ बनवण्याचे षड्यंत्र केले जात होते. आज विशाळगडावर रेहान मलिक या हिंदवी स्वराज्यद्रोह्याचा दर्गा बांधून त्याचे उदात्तीकरण केले जात आहे, तसेच या देशद्रोही षड्यंत्राला शासकीय साहाय्य दिले जात आहे. काही लोकप्रतिनिधी या दर्ग्यासाठी कोट्यवधी रुपयांचे साहाय्य करत आहेत. विशाळगडावरील रेहान मलिक याचा दर्गा आणि त्या सभोवतालचे अनधिकृत बांधकामे शासनाने उद्ध्वस्त करावीत; अन्यथा आम्ही ती करू, अशी आमची शासनाकडे मागणी आहे. देश-धर्म आणि संस्कृती जपणार्या उत्सवाचे पावित्र्य जपून हिंदूंनी बीभत्सपणा थांबवणे आवश्यक आहे.’’