बोरगाव सावरणी (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे ग्रामस्थांच्या रोषामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांना परत जावे लागले !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथील २ मुसलमान महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे या प्रकरणाचे पारदर्शक अन्वेषण होत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. या रागातून २३ ऑक्टोबर या दिवशी बोरगाव सावरणी येथे मंत्री अब्दुल सत्तार आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना रोखले. गावातील सर्व ग्रामस्थ जमा होऊन त्यांनी सत्तार यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. गावकर्यांचे हे उग्र रूप पाहून सत्तार यांनी तेथून काढता पाय घेतला. सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी सत्तार गावात आले होते.