माजी खासदार नीलेश राणे यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा !
मुंबई – माजी खासदार नीलेश राणे यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी ट्वीट करून राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ‘ट्वीट’मध्ये नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही. भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, याविषयी मी भाग्यवान आहे. राजकारणात पुष्कळ काही शिकायला मिळाले. कळत नकळत मी काही लोकांना दुखावले असेल, त्याविषयी मी खंत व्यक्त करतो. वर्ष २००९ मध्ये नीलेश हे लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. वर्ष २०१४ मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांचा पराभव केला. त्यांचे वडील नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नीलेश यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.