उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गामाता दौडीत २ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीसाठी २ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती होती. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, सरपंच मधुकर चव्हाण, ‘मराठा लाइट इन्फट्री’चे सुभेदार तुषार बिरजे, गांधीनगर येथील पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी या सर्वांच्या शुभहस्ते प्रारंभी श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी धारकरी श्री. विजय गुळवे, श्री. शरद माळी, श्री. नामदेव वाइंगडे, श्री. सुनील चौगुले यांसह अन्य उपस्थित होते.
कोल्हापूर येथील दौडीत जागवले ऐतिहासिक क्षण !
कोल्हापूर येथे दसर्याच्या निमित्ताने निघालेली श्री दुर्गामाता दौड शिवतीर्थापासून प्रारंभ झाली. यात छत्रपती शिवाजी महाराज यांसह मावळ्यांची वेशभूषा करण्यात आली होती. यातील बालचमूंचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. मार्गात ठिकठिकाणी ध्वजाचे औक्षण करून दौडीचे स्वागत करण्यात आले. दौडीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. कोल्हापूर शहरात काढण्यात आलेल्या दौडीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी, तर उंचगाव येथे धारकरी श्री. अजित (आप्पा) पाटील यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दसर्याच्या निमित्ताने हिंदूंना दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवला.
२. दौडीत क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक रिक्शावर लावले होते.