सोलापूर येथील श्री. आनंद गांगजी यांना रामनाथी आश्रमातील चंडी यागाच्या दुसर्या दिवशी आलेल्या अनुभूती !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा निमित्त रामनाथी आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडी याग होता. चंडी यागाच्या दुसर्या दिवशी म्हणजे १५.५.२०२३ या दिवशी श्रीगुरुकृपेने मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. यज्ञाच्या वेळी मला पुष्कळ चैतन्य आणि शक्ती जाणवत होती.
२. माझ्या मनाच्या एकाग्रतेने पुष्कळ वेळ ध्यान लागत होते.
३. ध्यान लागल्यावर ‘माझ्या शरिरातील ऊर्जा मस्तकात एकवटलेली आहे’, असे मला जाणवले.
४. ‘ब्रह्मांडातील आकाशगंगा माझ्या मस्तकावर गोल फिरत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले, तसेच मला माझ्या मस्तकावर सहस्र कमलदलांचे सूक्ष्मातून दर्शन होत होते. हे सर्व दृश्य विलोभनीय होते.
५. यज्ञाच्या वेळी ‘मी पूर्णपणे श्रीगुरुचरणांच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवत होते.
गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे मला या अनुभूती आल्या. त्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे. कृतज्ञता !’
– श्री. आनंद गांगजी, सोलापूर, महाराष्ट्र. (१८.५.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |