फाळणीच्या वेळी ३ कोटी असलेले मुसलमान आज ३० कोटी झाले, तरी ते अल्पसंख्य कसे ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय
वर्ष १९४७ मध्ये तुम्हाला (मुसलमानांना) अल्पसंख्यांक ही श्रेणी मिळाली होती. तेव्हा तुम्ही ३ कोटी अल्पसंख्येने होता. आता ३० कोटी असूनही अल्पसंख्य आणि ५० कोटी झालात, तरीही अल्पसंख्य ? या लोकांना कधीपर्यंत अल्पसंख्यांक समजणार, हेही राज्यघटनेत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता तर अनुसूचित जातीजमातींच्या आधारावर मुसलमानांनाही आरक्षण मिळणार आहे. त्यांना शासकीय नोकर्यांमध्येसुद्धा आरक्षण मिळणार आहे. ‘आम्ही अल्पसंख्यांक आहोत’, अशी आरडाओरड करत जे पाहिजे ते सरकारकडून घेतच आहेत. आज मंत्रालयात ‘अल्पसंख्यांक विभाग’ असा स्वतंत्र विभाग आहे आणि त्या विभागाला एक अल्पसंख्यांक मंत्रीसुद्धा आहे, म्हणजे अल्पसंख्यांकाच्या बुरख्याआड मंत्रीपद ! काय आहे ही अल्पसंख्यांकता ?