चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची त्रिसदस्यीय समिती आजपासून करणार पहाणी
चिपळूण – शहरातील बहादूरशेख चौकात उड्डाणपुलावरील ‘गर्डर’ बसवण्याचे काम चालू असतांना १६ ऑक्टोबर या दिवशी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर या पुलाची पहाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्याच वेळी मंत्री चव्हाण यांनी या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमल्याचे घोषित केले होते. हीच त्रिसदस्यीय समिती २५ ऑक्टोबरला येथे येत असून २६ आणि २७ ऑक्टोबर या कालावधीत या पुलाची पहाणी केली जाणार आहे. या समितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा आणि श्री. मिश्रा या तिघांचा समावेश आहे.