मैतेईंनी मणीपूरमध्ये चर्च जाळल्याने भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे सांगत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा थयथयाट !
आयझॉल (मिझोराम) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येथे (मिझोराम राज्यात) आल्यावर मी त्यांच्यासमवेत मंचावर असणार नाही. पंतप्रधानांनी येथे एकटे येऊन मंचावर एकट्याने त्यांचे विचार मांडले, तर बरे होईल. त्यांच्यानंतर मी स्वतंत्रपणे मंचावर येईन. मिझोरामचे लोक ख्रिस्ती आहेत. मणीपूरमधील मैतेई (हिंदु समाज) लोकांनी शेकडो चर्च जाळले, तेव्हा मिझोरामच्या सर्व लोकांनी निषेध केला. या वेळी भाजपविषयी सहानुभूती दाखवणे हा माझ्या पक्षासाठी मोठा नकारात्मक भाग असेल, असे फुकाचे विधान मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केले आहे. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान मोदी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ सभेसाठी पश्चिम मिझोराममधील मामित गावात येऊ शकतात.
झोरामथांगा यांचा पक्ष मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स आणि केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य आहे.
संपादकीय भूमिकामणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ? |