जिल्हाधिकार्यांनी गुरूंना स्वतःच्या खुर्चीवर बसवल्याने विरोध झाल्याने मागावी लागली क्षमा !
देहलीतील घटना
नवी देहली – दक्षिण-पश्चिम देहलीचे जिल्हाधिकारी म्हणून २०१९ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकारी लक्ष्य सिंघल यांनी त्यांच्या गुरूंना कार्यालयातील स्वतःच्या पदाच्या खुर्चीवर बसवले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सिंघल यांना विरोध होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी क्षमा मागितली आहे. भविष्यात अशी चूक न करण्याची ताकीद सिंघल यांना देण्यात आली आहे.
सिंघल यांनी त्यांच्या गुरूंना खुर्चीवर बसल्यावर पुष्पहार अर्पण करून शाल अर्पण केली. यानंतर ते हात जोडून गुरूंसमोर नतमस्तक झाले. याविषयी सिंघल म्हणाले की, ज्या व्यक्तीला मी खुर्चीवर बसवले ते माझ्या जन्मापासून माझे गुरु आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना माझ्या कार्यालयात बोलावले होते. मी महाविद्यालयात असतांना त्यांनीच मला प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची सिद्धता करण्याचा सल्ला दिला होता. भविष्यात अशी चूक होणार नाही, याची काळजी घेईन.
संपादकीय भूमिका
|