ललित पाटील याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 

मुंबई – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील याला अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ललित पाटील याने पलायन केले होते. पोलिसांनी बंगळुरू येथून त्याला नुकतेच कह्यात घेतले. तो रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. अन्वेषणासाठी न्यायालयाने ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.