५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. जप्त !
मुंबई पोलिसांची गेल्या २ वर्षांतील कारवाई !
मुंबई – मुंबई पोलिसांनी गेल्या २ वर्षांत ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या कारवायांमध्ये नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूर येथे एम्.डी. निर्मिती करणारा प्रत्येकी एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ७१८ आरोपींना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकामुंबईतील व्यसनाधीनता रोखणे आवश्यक ! |