अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सूवर्ण मेखला आहे अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात. शमीपत्र तेज तत्त्वाचे उत्तम संवर्धक आहे. शमीच्या झाडाजवळ अपराजितादेवीची पूजा केल्याने शमीच्या पात्रात पूजेतून निर्माण झालेली शक्ती टिकून रहाते. या दिवशी शक्तीतत्त्वाने भारीत झालेल्या शमीपत्राला घरात ठेवून सजिवांना वर्षभर या शक्तीतत्त्वाचा लाभ घेणे सहज शक्य आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.