गोव्यातून आंध्रप्रदेशला नेण्यात येणारे मद्य बेळगाव येथे कह्यात
पणजी – गोव्यातून अवैधपणे नेण्यात येणारे ४३ लाख ९३ सहस्र रुपये किमतीचे मद्य कर्नाटक अबकारी खात्याच्या बेळगाव विभागाने पिरनवाडी क्रॉस, बेळगाव येथे २२ ऑक्टोबर या दिवशी कह्यात घेतले. या वेळी विविध बनावटीच्या मद्याच्या बाटल्या असलेले एकूण २५० खोके आणि २० लाख रुपये किमतीचे वाहन कह्यात घेण्यात आले. या वेळी आंध्रप्रदेशमध्ये नोंदणी झालेल्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. (हे मद्य गोव्याच्या सीमेवरून विनातपास बेळगावला पोचले कि लाच घेऊन ते सोडण्यात आले ? हल्ली काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करणार का ? – संपादक)