आज भरणे (खेड) येथे श्री काळकाईदेवीला शासकीय मानवंदना !
भरणे (खेड) – रत्नागिरी जिल्ह्याची कुलस्वामीनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्री काळकाईदेवीला नवरात्रौत्सव आणि शिमगा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना (सलामी) देण्यात येणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी याविषयी मुख्यमंत्री सचिवालयात पाठपुरावा केला होता. यावर्षी प्रथमच भरणे येथील श्री काळकाईदेवीला २४ ऑक्टोबर या दिवशी दसरा कार्यक्रमात पोलीस पथकाकडून शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे.
तालुक्यातील भरणे येथे श्री देवी काळकाईचे श्री देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवास २६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या दसर्याच्या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी २४ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता श्री काळकाईदेवी मंदिरात उपस्थित रहावे, असे आवाहन श्री काळकाईदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिन जाधव आणि सचिव सुजित शिंदे यांनी केले आहे.