पुणे येथील कात्रज घाटातील श्री चामुंडाभवानीमाता मंदिरातील चोरी प्रकरणी एकास अटक !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
पुणे – कात्रज घाटातील श्री चामुंडाभवानीमाता मंदिरांमध्ये २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी चोरी झाली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या चोरीचे अन्वेषण करत सुनील कांबळे या चोरास अटक केली. त्याच्याकडून २ लाख ६० सहस्र रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आरोपी विरोधात ५० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो दुहेरी हत्या प्रकरणामध्ये वर्ष २०१८ पासून कारागृहामध्ये होता. मार्च २०२३ मध्ये तो जामिनावर बाहेर आला आणि त्याने २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी मंदिरातील दागिन्यांची चोरी केली. (अट्टल गुन्हेगारांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशा गुन्हेगारांना जामीन द्यायचा कि नाही ? हे ठरवणे आवश्यक आहे ! – संपादक)