पुणे येथे विद्यार्थी पोषण आहार योजनेतील तांदळाची खुल्या बाजारात विक्री करणार्या दोघांवर गुन्हा नोंद !
८ लाख ९६ सहस्र २०० रुपयांचा तांदूळ
पुणे – शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संतोष रामदास फाटके यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
धायरी भागात ‘संस्कार महिला मंडळा’चे स्वयंपाक घर आहे. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’ योजनेच्या अंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ‘पोषण नवरात्र २०२३’ आहार दिला जातो. शासकीय योजनेतील ८ लाख ९६ सहस्र २०० रुपयांचा तांदूळ सानप आणि गोयेकर यांच्याकडे देण्यात आला होता. दोघेजण टेंपोतून शासकीय योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघाले होते. याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले.
संपादकीय भूमिका :पोषण आहारासारख्या धान्यामध्येही गैरप्रकार होणे, हे संतापजनक आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे ! |