भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा नोंद !
|
बीड – शेतात मका काढणार्या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंगही करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला असून त्याच्या फॉरेन्सिक पडताळणीची मागणी आमदार धस यांनी केली आहे. गावातील रघु पवार आणि राहुल जगदाळे यांनी महिलेसमवेत वरील प्रकार केले होते. पीडितेच्या सुनेने या वेळी घटनेचा व्हिडिओ सिद्ध केला. त्यात प्राजक्ता धस याही दिसत आहेत. त्या ‘मारहाण करा’, असे सांगत होत्या.
या प्रकरणी धस म्हणाले, ‘‘हा आरोप खोटा असून राजकीय दबावापोटी गुन्हा नोंदवला आहे. सामाजिक माध्यमांवर दाखवलेल्या व्हिडिओंमध्ये पालट केलेले आहेत. पोलिसांनी सत्य बाहेर आणावे.’’