छत्रपती संभाजीनगर येथे बर्फी बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांची धाड !

१२ लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त !

जप्त केलेले साहित्य (सौजन्य: जय महाराष्ट्र)

छत्रपती संभाजीनगर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिटमिटा येथील बर्फी बनवणार्‍या एका कारखान्यावर नुकतीच पोलिसांनी धाड घातली. यामध्ये ६०० किलो बर्फीच्या साहित्यासह ५९८ किलोचा साठा, २ सहस्र ४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ सहस्र ३ लिटर रिफाइंड सोयाबीन ऑईल, २९८ किलो रवा, १ सहस्र ३४८ किलो साखर, असा एकूण १२ लाख ८ सहस्र ४०४ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.

जप्त केलेले साहित्य हे बनावट आहे का ? याची पडताळणी करण्यात येणार आहे. किरण बच्चनलाल सिंग यांच्या कारखान्यात बनावट बर्फी सिद्ध होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अजित मैत्रे यांना मिळाली होती. यावरून त्यांच्या पथकाने कारखान्यावर धाड घातली.