Lakshmi : लक्ष्मी चंचल नाही !
लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो. लक्ष्मीला भोगप्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोल गर्तेत गडगडत जातो, तर लक्ष्मीचे मातृवत् पूजन करून तिला प्रभुचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनतो आणि सृष्टीला पावन करतो. स्वार्थात वापरले जाते ते वित्त, परार्थे वापरली जाते ती लक्ष्मी आणि प्रभुकार्यात वापरली जाते ती महालक्ष्मी ! महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत येते. हत्ती हा औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी खर्च करणार्याच्या घरात ती पिढ्यान्पिढ्या राहिलेली आहे. रघुवंश याचे ज्वलंत उदाहरण आहे. लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्यामुळे ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे. त्यामुळे त्याचा उपयोग होतो.
– (साभार : ‘हरी-विजय दिपोत्सव २००८’)