आचारधर्म म्हणजे नक्की काय ?
‘जीव हा सर्व ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तो त्यापासून (पिंड आणि ब्रह्मांड एक) वेगळा नाही. आचारधर्मात सांगितलेल्या जीवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी एक आहेत, ही जाणीव सतत प्रतिष्ठित अन् जागृत असते. सोप्या भाषेत सांगायचे, म्हणजे धर्मानुसार करण्यात आलेले प्रत्येक कर्मपिंड आणि ब्रह्मांड एकजीव आहेत, हे मनात ठसवत असते. त्यामुळे त्या जीवाची प्रत्येक क्रिया सृष्टी व्यापाराला अनुकूल असते.
त्या पुढील गोष्ट ही की, त्या कर्मानंतर विश्वाची त्या जीवावर होणारी प्रतिक्रिया ही अर्थातच त्याचा योगक्षेम चालवणारी आणि कल्याण करणारी असते.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३)