मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !
इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टिनी लोकांचे समर्थन न केल्यावरून मुसलमानांकडून जस्टिन ट्रुडो यांना विरोध !
ओटावा (कॅनडा) – येथील मुसलमानांनी एका मशिदीत २० ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो गेले होते. या वेळी जमावाने त्यांना पुष्कळ विरोध केला. यासह इस्रायल-हमास युद्धात ट्रुडो यांची भूमिका इस्रायल समर्थक असल्याने जमावाने त्यांच्यावर टीका करत त्यांना अपशब्द वापरत अपमानित केले. कॅनडातील मुसलमान संघटनांनी हा कार्यक्रम पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन देण्याच्या उद्देशाने आयोजित केला होता.
१. ‘द टोरंटो सन’ या वृत्तसंस्थेनुसार ट्रुडो यांच्या मशिदीतील दौर्याच्या वेळी जमावाने त्यांच्या विरोधात ‘शर्म करो, शर्म करो’, अशा प्रकारची घोषणाबाजी केली. एकाने तर आयोजकांना म्हटले की, ट्रुडो यांना कार्यक्रमाला संबोधित करण्यास देऊ नये.
२. या वेळी ट्रुडो म्हणाले की, या कठीण समयी आपण एकत्रितरित्या प्रार्थना केल्याविषयी धन्यवाद !
३. या घटनेचा ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
संपादकीय भूमिका
|