इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार !
|
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेने २१ ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायल-हमास युद्धाच्या संदर्भात एक प्रस्ताव सादर केला. यामध्ये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले असून यामध्ये इराणला विरोध करण्यात आला आहे.
प्रस्तावात सांगण्यात आले आहे की, इराणने संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्या आतंकवादी गटांना शस्त्रास्त्रे पुरवणे थांबवले पाहिजे. इराण हमासला पाठिंबा देण्यासह आणखी एक पॅलेस्टिनी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक जिहाद’लाही आर्थिक साहाय्य आणि शस्त्रे पुरवतो, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. आतंकवादी आक्रमणांना प्रत्युत्तर देतांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. यासह गाझा पट्टीत आवश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित रूपाने चालू रहावा.