इस्रायलने वेस्ट बँकच्या अल्-अन्सार मशिदीवर केले आक्रमण !
हमासने मशिदीला बनवले होते केंद्र !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने वेस्ट बँकमधील जेनिन भागातील अल्-अन्सार मशिदीवर हवाई आक्रमण केले. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने ट्वीट करून ही माहिती दिली. यात म्हटले आहे की, गुप्तचरांनी आम्हाला सांगितले की, हमासच्या सैनिकांनी मशिदीला कमांड सेंटर बनवले आहे. ते येथूनच आक्रमणाची योजना आखत असत.
The IDF & ISA just conducted an aerial strike on a Hamas and Islamic Jihad terrorist compound in the Al-Ansar Mosque in Jenin.
Recent IDF intel revealed that the Mosque was used as a command center to plan and execute terrorist attacks against civilians. pic.twitter.com/gQfyv6wUAV
— Israel Defense Forces (@IDF) October 22, 2023
इस्रायलने एक दिवस आधी वेस्ट बँकमधील निर्वासितांच्या छावणीवरही हवाई आक्रमण केले. इस्रायलच्या सैन्याने २१ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा वेस्ट बँकवर धाड टाकली. युद्ध चालू झाल्यापासून आतापर्यंत ६७० पॅलेस्टिनींना अनेक भागांत अटक करण्यात आली आहे. यांपैकी ४५० पॅलेस्टिनी हमासशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताने गाझाला पाठवली साहाय्य सामग्री !
नवी देहली – भारताने पॅलेस्टाईसाठी सुमारे ६ सहस्र ५०० किलो वैद्यकीय साहाय्य आणि ३२ सहस्र किलो आवश्यक वस्तू पाठवल्या आहेत. ‘ही भारतातील जनतेने पॅलेस्टिनींना दिलेली भेट आहे’ असे या साहित्यांच्या पेट्यांवर लिहिले आहे. हे साहित्य इजिप्तच्या राफा सीमेवरून गाझा येथे नेले जाणार आहे. यामध्ये अनेक आवश्यक औषधे, शस्त्रकर्म उपकरणे, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
🇮🇳 sends Humanitarian aid to the people of 🇵🇸!
An IAF C-17 flight carrying nearly 6.5 tonnes of medical aid and 32 tonnes of disaster relief material for the people of Palestine departs for El-Arish airport in Egypt.
The material includes essential life-saving medicines,… pic.twitter.com/28XI6992Ph
— Arindam Bagchi (@MEAIndia) October 22, 2023
संपादकीय भूमिकामशिदीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो, हे पुनः एकदा स्पष्ट झाले ! इस्रायलने आतंकवाद्यांना ठार करण्यासाठी थेट मशिदीवर आक्रमण केले. भारताने मशिदीत राहून आतंकवादी कारवाया करणार्यांवर अशी कृती केली, तर भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ते स्वीकारतील का ? |