छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी स्वदेश, स्वधर्मनिष्ठा श्री दुर्गादेवीने हिदूंमध्ये निर्माण करावी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
३ सहस्रांहून अधिक धारकरी आणि शिवप्रेमी उपस्थित श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !
सांगली, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात स्वत:ची नाणी होती, स्वत:च्या तोफा होत्या. स्वराज्यातील प्रत्येक गोष्टीत आपण स्वयंपूर्ण असावे, याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे ‘श्री दुर्गादेवीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी स्वदेश, स्वधर्मनिष्ठा हिंदूंमध्ये निर्माण करावी’, असा आशीर्वाद आपण देवीकडे मागितला पाहिजे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या आठव्या दिवशी, म्हणजे २२ ऑक्टोबर या दिवशी येथील माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्यांना मार्गदर्शन करत होते. श्री दुर्गामाता दौडीसाठी ३ सहस्रांहून अधिक धारकरी आणि शिवप्रेमी यांची उपस्थिती होती.
या श्री दुर्गामाता दौडीसाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती. श्री दुर्गादौडीच्या आरंभी या दोघींच्या शुभहस्ते ध्वजपूजन करण्यात आले.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या भाषणातील अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे
१. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी एक इंग्रज महाराजांच्या भेटीसाठी आला होता. त्या इंग्रजाने ‘इंग्रज सरकार बनवत असलेली नाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांपेक्षा अधिक चांगली, चकचकीत, गुळगळीत, गोलाकार आहेत’, असे सांगितले. ‘तुम्हाला जर अशी नाणी हवी असतील, तर आम्ही देऊ’, असेही तो म्हणाला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘दत्तक घेऊन वंश चालवावा, या मताचा मी नाही’, असे बाणेदार उत्तर दिले.
२. एका फ्रेंच व्यक्तीने ‘उत्तम दर्जाच्या तोफा महाराजांना देऊ शकतो’, असे सांगितले. यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोफा अन्य कुणाकडूनही न घेता पुरंदर गडावर तोफा बनवण्याचा कारखाना चालू केला.
३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्या प्रती जी तळमळ होती, ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, असे मागणे आपण श्री दुर्गामातेकडे मागितले पाहिजे.
४. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कार्य केलेल्या भूमीत आपल्याला जन्म मिळूनही आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अपेक्षित अशी कृती करत नाही. हिंदूंकडे स्वभाषा, संस्कृती यांचा अभिमान नाही. आपल्याकडे धर्माप्रती कडवेपणा नाही. हा कडवेपणा आपल्यात निर्माण झाला पाहिजे, असे आवाहनही पू. भिडेगुरुजी यांनी या प्रसंगी केले.
श्री दुर्गादौडीतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. दौडीचे सांगली शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दौडीच्या मार्गावर ठिकाठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच रस्ते फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आले होते.
२. टिळक चौक येथे दौडीचे स्वागत करण्यात आले. तेथे एका मुलीने राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केली होती. येथे हलगी (एकप्रकारचे वाद्य) वाजवण्यात येत होती, तसेच घोडा आणण्यात आला होता. यामुळे तेथील वातावरण ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारे ठरले.
३. दौडीत अग्रभागी असलेला भगवा ध्वज, धारकर्यांनी परिधान केलेले भगवे फेटे आणि शिस्तबद्ध रितीने दौडीत दौडत जाणारे धारकरी पाहून नागरिकांनाही राष्ट्र-धर्म कार्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली.
४. दौडीत धारकरी राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम निर्माण करणारी विविध गीते म्हणत होते.
सद्गुरुद्वयींची श्री दुर्गामाता मंदिरात आरतीसाठी उपस्थिती !
माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभ हस्ते देवीची आरती करण्यात आली. या प्रसंगी श्री दुर्गामाता मंदिराच्या वतीने सौ. लिला विनोद नावंधर, त्यांची सून सौ. स्नेहल सूरज नावंधर आणि सौ. अश्विनी शीतल नावंधर यांच्या हस्ते श्री दुर्गामाता मंदिर येथे भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी श्रीमती शकुंतला मदनलाल नावंधर (वय ८५ वर्षे) मंदिराचे विश्वस्त श्री. विनोद नावंधर, श्री. निखिल विजय नावंधर, तसेच विविध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर
याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री हणमंतराव पवार, राजू पुजारी, मिलिंद तानवडे, हरिदास कालीदास, राहुल बोळाज, संतोष लोखंडे, सूरज कोळी, राजाभाऊ शहापुरे, ‘जनसुराज्य शक्ती पक्षा’चे युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, उद्योपती श्री. मनोहर सारडा, श्री. सुमंत कुलकर्णी, सौ. कुलकर्णी, डॉ. अर्जुन पाटील, सुषमा पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश नाईक, माजी नगरसेवक श्री. मंगेश चव्हाण, अधिवक्ता गिरीश तपकिरे, ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. विनायक शेटे, सांगली येथील तलाठी श्री. विक्रम कांबळे, उद्योगपती श्री. शेखर शेट्टी, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे मनोहर बाबर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, कु. प्रतिभा तावरे, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष
१. शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. सुनंदा कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे औक्षण करण्यात आले, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे औक्षण केले.
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. मधुरा वेलणकर यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा परिचय करून दिला.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या मूळच्या सांगलीच्या असल्याने सांगली येथील त्यांच्या परिचयाचे अनेक नागरिक, महिला यांनी श्रीचित्शक्ति यांची आपुलकीने भेट घेतली.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दौडीच्या ठिकाणी आगमन झाल्यावर अनेक महिला ‘या दोघी कोण आहेत ?’, असे जिज्ञासेने विचारत होत्या, तसेच या दोघींचे अनेकांनी लक्ष वेधून घेतले.
क्षणचित्रे
१. दौडीचे सांगली शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दौडीच्या मार्गावर ठिकाठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच रस्ते फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजपूजन !
सांगली येथे श्री दुर्गादौड प्रारंभ होण्यापूर्वी पहाटे ५.४५ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते भगव्या ध्वजाला पुष्पहार अर्पण करून ध्वजपूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी भगवा ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घातली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही काही काळ भगवा ध्वज हातात घेतला.
श्री दुर्गामाता दौडीच्या प्रारंभीच्या विशेष घटना
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे औक्षण केले.
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. सुनंदा कुलकर्णी यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे औक्षण केले.
३. माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभ हस्ते देवीची आरती करण्यात आली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा श्री दुर्गादौडीत सहभाग !
पू. भिडेगुरुजी यांनी सांगली येथे होणार्या श्री दुर्गादौडीमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना निमंत्रित केले होते. त्यांचे निमंत्रण आनंदाने स्वीकारत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्री दुर्गादौडीत सहभागी झाल्या. या वेळी दोघी काही काळ श्री दुर्गादौडीत सहभागी झाल्या. दौडीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. दौडीत देण्यात येणार्या घोषणांमुळे वातावरण उत्साही बनले.
श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी उपस्थित मान्यवर
याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री हणमंतराव पवार, राजू पुजारी, मिलिंद तानवडे, हरिदास कालीदास, राहुल बोळाज, संतोष लोखंडे, सूरज कोळी, राजाभाऊ शहापुरे, ‘जनसुराज्य शक्ती पक्षा’च्या युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, उद्योगपती श्री. मनोहर सारडा, डॉ. सुमंत कुलकर्णी, सौ. कुलकर्णी, डॉ. अर्जुन पाटील, सुषमा पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश नाईक, माजी नगरसेवक श्री. मंगेश चव्हाण, अधिवक्ता गिरीश तपकिरे, सांगली जिल्हा कारागृह महाअधीक्षक विवेक झेंडे, सांगली जिल्हा वरिष्ठ कारागृह अधिकारी महादेव होरे, ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. विनायक शेटे, सांगली येथील तलाठी श्री. विक्रम कांबळे, उद्योगपती श्री. शेखर शेट्टी, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे मनोहर बाबर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच समितीचे श्री. संतोष देसाई, कु. प्रतिभा तावरे, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पू. भिडेगुरुजी यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतली सदिच्छा भेट !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भावस्पर्शी सदिच्छा भेट घेतली. ही भेट पू. गुरुजींच्या धारकरी सौ. सुनंदा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सौ. सुनंदा कुलकर्णी यांनी पाद्यपूजा केली.
श्री दुर्गामाता दौड युवकांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचे नवचैतन्य निर्माण करते !
श्री दुर्गामाता दौड युवकांमध्ये ९ दिवस राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची एक नवचैतन्य अन् ऊर्जा निर्माण करते. दौडीसाठी युवक पहाटे ४.३०-५ वाजता उठून राष्ट्र-धर्म कार्य करण्याची प्रेरणा घेऊन पहाटे ५.३० वाजता प्रतिदिन शिवतीर्थावर उपस्थित असतात. यामुळे एक शिस्त अंगी बाणवली जाते. श्री दुर्गामाता दौड ९ दिवस विविध उपनगरांत जाते. त्यामुळे ९ दिवस संपूर्ण सांगली शिवमय होऊन जाते. प्रत्येक चौकात तेथील नागरिक अत्यंत आत्मीयतेने दौडीचे स्वागत करतात. श्री दुर्गामाता दौड महाराष्ट्राबाहेरही कर्नाटक, गुजरात यांसह विविध राज्यांमध्ये काढण्यात येते. ठिकठिकाणी श्री दुर्गादौडीचे आयोजन करून हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या श्री दुर्गादौडींना हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेच्या ‘दुर्गादौड’च्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश
‘दुर्गादौड’च्या निमित्ताने युवकांचे पडलेले प्रत्येक पाऊल, हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारे असेल !
ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असलेले पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या संकल्पातून चालू झालेली श्री शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गादौड’ ही चळवळ आज युवाक्रांतीचे रूप धारण करत आहे, हे पाहून अतिशय आनंद होत आहे. पू. गुरुजी या वयात युवकांना लाजवतील, अशा क्षमतेने कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श आज हिंदु समाजाने घ्यायला हवा. त्यांच्या या कार्याला हार्दिक शुभेच्छा ! भगवंताने त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले कार्य वृद्धींगत करावे, यासाठी त्यांना आयुरारोग्य प्रदान करावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !
नवरात्रीत ‘दुर्गादौड’मध्ये सहभागी होणार्या हिंदु युवाशक्तीला माझा नमस्कार ! या उपक्रमाच्या नावात साक्षात् आदिशक्ती श्री दुर्गामातेचे नाव आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची एकत्रित शक्ती कार्यरत असते’, या अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार जेथे देवतेचे नाव असते, तेथे साक्षात् त्या देवतेचे अस्तित्व असते. यानुसार ‘दुर्गादौड’मध्ये साक्षात् आदिशक्तीचे अस्तित्व आहे. त्यामुळे सर्वांनी या भावाने यामध्ये सहभागी होऊन श्री दुर्गादेवीच्या कृपेचा लाभ घ्यावा.
समर्थांनी जसे म्हटले आहे, ‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’ त्यानुसार ‘भगवंताचे अधिष्ठान ठेवून कार्य करा’, हे पू. गुरुजी आपल्यामध्ये रूजवत आहेत. ‘धर्मकार्य करतांना ईश्वराची कृपा, ईश्वराची शक्ती आपल्याला मिळाली, तर कार्यसिद्धीस जाते’, हे या चळवळीला मिळत असलेल्या प्रतिसादावरून आपल्या सर्वांना लक्षात येत असेलच.
पू. गुरुजी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श ठेवत आहेत. या दोन्ही थोर पुरुषांनी ‘शक्तीची उपासना’ केलीच, यासह ‘उपासनेची शक्ती’ही मिळवली; म्हणून ते हिंदवी स्वराज्य समर्थपणे उभारू शकले आणि चालवू शकले. त्यानुसारच आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर युवासंघटनाची शक्ती निर्माण करायचीच आहे; मात्र त्यासाठी प्रचंड आत्मबळ हवे. ‘हे आत्मबळ धार्मिक उपासना अर्थात् साधनेतून निर्माण होते’, हे ध्यानात घ्या.
पू. गुरुजी हे त्यांच्या आचरणातून आपल्याला आदर्श शिकवण देत आहेत. ही शिकवण आपण आचरणात आणली, तर एक आदर्श धारकरी, एक आदर्श हिंदु राष्ट्रवीर, एक आदर्श शिवरायांचा मावळा निर्माण होऊ शकेल ! ‘दुर्गादौड’च्या निमित्ताने युवकांचे पडलेले प्रत्येक पाऊल, हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारे आहे ! आपल्या सर्वांना हे धर्मसंस्थापनेचे कार्य आणि उपासना करण्यासाठी भगवंताने शक्ती, बुद्धी आणि भक्ती द्यावी, यासाठी मी प्रार्थना करतो. नमस्कार !
– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (२१.१०.२०२३)