हिंदु जनजागृती समितीच्या कार्याबद्दल धर्माभिमान्यांमध्ये असलेला विश्वास !
१. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सभेच्या प्रसारासाठी गावात बैठक आयोजित करणे
‘हडपसर, पुणे येथील सभेच्या प्रसाराच्या वेळी एका गावातील सामाजिक कार्यकर्त्यांची समितीच्या कार्यकर्त्यांशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी सभेच्या प्रसारासाठी गावात एक बैठकसुद्धा आयोजित केली. त्या बैठकीत समितीच्या कार्यकर्त्यांनी लँड (भूमी) जिहाद, लव्ह जिहाद आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. ८.१.२०२३ या दिवशी झालेल्या हडपसर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते उपस्थित होते.
२. ‘हिंदु जनजागृती समितीचे वक्ते आले, तर धर्मजागृतीचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत जाईल’, असा विश्वास असणारे एक धर्माभिमानी
१४.५.२०२३ या दिवशी एका धर्माभिमान्यांना त्यांच्या गावात दिनांकानुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची होती. तेव्हा त्यांनी समितीच्या कार्यकर्त्याला ‘जयंती तिथीनुसार कि दिनांकानुसार साजरी करावी ?’, असे विचारले. तेव्हा त्यांना ‘तिथीला साजरी करूया’, असे सांगितल्यावर त्यांनी ते लगेच स्वीकारले आणि तिथीनुसार जयंती साजरी करण्याचे ठरवले. ‘गावात प्रथमच मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करणार असल्याने हिंदु जनजागृती समितीचे वक्ते आले, तर धर्मजागृतीचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत जाईल’, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.
३. एका धार्मिक वादामध्ये गावातील धर्माभिमान्यांनी त्या प्रसंगात ‘योग्य काय असायला हवे ?’, याविषयी हिंदु जनजागृतीच्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेणे
एका गावामध्ये वक्फ बोर्ड अंतर्गत एक धार्मिक वाद निर्माण झाला. त्या वेळी एका धर्माभिमान्यांनी गावात निर्माण झालेल्या या समस्येवर समितीच्या कार्यकर्त्याला ‘यावर पुढे काय कृती करता येईल का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांना ‘काय करू शकतो ?’, याविषयी प्राथमिक माहिती सांगितली. यानंतर त्या धर्माभिमान्याने गावातील अवैधपणे चालू झालेले दर्ग्याचे बांधकाम थांबवले. गावातील ग्रामसभेत दर्गा बांधकाम आणि वक्फ बोर्ड ॲक्टद्वारे जमीन गिळंकृत करण्याचा धर्मांधांच्या कृतीचा तीव्र निषेध केला. त्यांच्या या निषेधानंतर गाव संघटित झाले. त्यानंतर त्या धर्माभिमान्याने पीर दर्गा बांधकाम समितीवर गावातील ग्रामस्थांनासुद्धा घ्यायला लावले. अशा प्रकारे १३ जणांच्या त्या समितीवर एकूण १० – ११ हिंदूंना घ्यायला भाग पाडले. ‘त्या समितीच्या मान्यतेविना कसलेही बांधकाम करायचे नाही आणि यापुढे त्या जागेत नमाज पढायला जायचे नाही, तसेच बाहेरून कुणी अन्य मुसलमान व्यक्तीला तिथे घेऊन यायचे नाही’, अशी सक्त ताकीद त्यांनी सभेत दिली आणि गावातील मुसलमानांना तसे सांगितले. ‘यापुढेही हिंदु जनजागृती समितीचे कायदेशीर दृष्टीने सहकार्य असावे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
४. हिंदुत्वनिष्ठ युवकांच्या गटामध्ये ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने विविध विषयांवर मार्गदर्शन करत रहावे’, अशी इच्छा गटातील हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त करणे
भोर येथे हिंदुत्वनिष्ठ युवकांचा एक गट आहे. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते ‘जागो हिंदू’च्या पोस्ट, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख आणि वृत्ते पाठवत असतात. या सर्व पोस्ट वाचून गटातील एका धर्मप्रेमीने त्या गटात ‘हिंदु जनजागृती समिती ही एकमेव संघटना आहे, जी आपल्याला योग्य दिशादर्शन देऊ शकते. आपण त्यांचे मार्गदर्शन घेऊया’, असा संदेश पाठवला. नंतर त्या संघटनेच्या बैठकीत ‘हिंदु जनजागृती समितीचे जे कार्यकर्ते गटात पोस्ट पाठवतात, त्यांनी आपल्याला विविध विषयांवर मार्गदर्शन करत रहावे’, अशी चर्चा झाली. ओळखीच्या दोन धर्मप्रेमींनी तसे भ्रमणभाष करून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याला हे सर्व कळवले.
वरील प्रसंगांतून समितीच्या कार्यावर असणारा विश्वास लक्षात आला. यामुळे ‘समाजातील धर्माभिमान्यांना समितीचा आधार वाटत आहे’, असे लक्षात आले.’
– गुरुचरणी कृतज्ञता,
श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे), पुणे.