नवरात्रोत्सवात २ गटांत वाद ! 

वाद न घालता सण उत्साहात साजरे करा !

प्रतीकात्मक छायाचित्र

डोंबिवली – येथील एका मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २ गटांत वाद झाला. त्यातच तेथे ५० ते ६० तरुण अचानक एकमेकांशी भांडू लागले. त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक घाबरून इतरत्र पळत सुटले. दगड आणि चॉपर यांनी एकमेकांवर वार करण्यात आले. या हाणामारीत ४ ते ५ जण गंभीर घायाळ झाले. पोलीस आल्यावर तरुणांनी पळ काढला.