विधीमंडळांचे हिवाळी अधिवेशन केवळ १० दिवस असण्याची शक्यता !
नागपूर – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत येथे होईल. प्रतिवर्षी हे अधिवेशन शुक्रवारी संपते; पण यंदा ते बुधवारी म्हणजे २० डिसेंबर या दिवशी संपणार असल्यामुळे अधिवेशन अवघ्या १० दिवसांचे असण्याची शक्यता आहे.
‘राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून चालू होणार आहे. या कालावधीत केवळ १० दिवसांचे कामकाज होईल’, असे विधीमंडळाच्या कामकाज दिनदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे. २० डिसेंबरनंतर अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाईल.