Supreme Court : नाल्यांची स्वच्छता करतांना मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांची हानीभरपाई द्या !
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
नवी देहली – देशात गेल्या ५ वर्षांत नाल्यांची स्वच्छता करतांना ३४७ जणांचा मृत्यू झाला. अशा मृतांच्या नातेवाइकांना ३० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करतांना केंद्र आणि राज्य सरकारांना दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, नाल्यांची स्वच्छता करतांना कायमचे विकलांग झालेल्यांना किमान २० लाख रुपये आणि आजारी पडलेल्यांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी.
संपादकीय भूमिकाअसा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सरकारांना स्वतःला हे कळत कसे नाही ? |