INS Imphal : स्वदेशी बनावटीची ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका ४ महिन्यांपूर्वीच नौदलाला सुपुर्द !
|
मुंबई – मार्गदर्शित (गायडेड) क्षेपणास्त्र नाशक असलेली तिसरी स्टिल्थ युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ नौदलाकडे सुपुर्द करण्यात आली. ही भारतात बनलेली शक्तीशाली युद्धनौका आहे. निर्धारित समयमर्यादेच्या ४ महिने आधीच तिचे काम पूर्ण झाले. ही युद्धनौका पृष्ठभाग ते पृष्ठभाग सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे ‘बराक-८’ क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज आहे. ही युद्धनौका संरक्षण मंत्रालयाचे मुंबई स्थित शिपयार्ड ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली आहे. ‘इंफाळ’ ही नौदलाची पहिली युद्धनौका आहे, ज्यामध्ये महिला अधिकारी आणि खलाशी यांच्या रहाण्याचीही सोय करण्यात आली आहे. या युद्धनौकेवर ३१२ लोक राहू शकतात.
Defence Ministry shipyard Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) has delivered the third stealth destroyer ‘Imphal’ of Project 15B Class Guided Missile Destroyer to the Indian Navy.
The ship is constructed using Indigenous Steel DMR 249A and is amongst the largest Destroyers… pic.twitter.com/IxeZRyJBxf
— ANI (@ANI) October 20, 2023
संपादकीय भूमिकासरकारी कामांमध्ये सर्वसामान्य झालेला चालढकलपणा आणि हलगर्जीपणा पहाता वेळेच्या ४ महिने आधीच युद्धनौकेचे काम पूर्ण झाले, हे स्तुत्य आहे. यासाठी ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ आस्थापन हे जनतेच्या अभिनंदनास पात्रच आहे ! |