विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणातील मकोकाचे आरोपी निर्दोष 

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे – डोंबिवली येथील १४ वर्षीय मुलाचे १५ वर्षांपूर्वी शाळेत जातांना खंडणीसाठी अपहरण करून त्याला जंगलात ठार मारले होते. या प्रकरणी अटकेतील ४ आरोपींची मकोका न्यायालयाने आरोपातून निर्दोष सुटका केली. ‘पोलिसांनी अन्वेषणात गंभीर त्रुटी ठेवल्या. सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले नाहीत. त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली’, असे न्यायाधिशांनी म्हटले.