गोवा : श्री सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली !
संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन !
पेडणे, २० ऑक्टोबर (वार्ता.) : पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाने गतवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना श्री सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली आहे. महाविद्यालयात यंदा सरस्वती पूजनाला अनुमती द्यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी २० ऑक्टोबर या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले आणि अनुमती मिळेपर्यंत जागेवरून हालणार नसल्याची भूमिका घेतली.
(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)
प्राप्त माहितीनुसार यंदा महाविद्यालयात श्री सरस्वती पूजन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना १४ ऑक्टोबर या दिवशी विनंती पत्र दिले होते; मात्र महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अजूनही श्री सरस्वती पूजन करण्यासाठी अनुमती दिलेली नाही. सरकारी अनुदानित महाविद्यालय असल्याने अनुमती नाकारली जात असल्याचे समजते. (चर्चच्या डायोसेसन संस्थेच्या कित्येक शाळांना सरकारी अनुदान मिळते. तेथे ख्रिस्ती धर्मानुसार अनेक गोष्टी चालतात. तेथील काही शिक्षकही फादर असतात. हे चालते, तर श्री सरस्वती पूजन का चालत नाही ? – संपादक) महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गेल्यावर्षीही याच कारणावरून अनुमती नाकारली होती. गेल्यावर्षी श्री सरस्वती पूजनासाठी अनुमती न दिल्याने नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सकाळी श्री सरस्वतीचे पूजन करून सायंकाळी श्रींचे विसर्जन केले होते. महाविद्यालयाने यंदाही अनुमती नाकारल्यास विद्यार्थीवर्ग अशीच भूमिका यंदाही घेण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|