चीन वर्ष २०३० पर्यंत बनवणार १ सहस्र अणूबाँब ! – अमेरिका
बीजिंग – चीनला जगातील सर्वांत मोठी महासत्ता बनायचे आहे. यासाठी अण्वस्त्रांचा साठा वाढवण्यात चीन व्यस्त आहे. वर्ष २०३० पर्यंत १ सहस्र अणूबाँब विकसित करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेच्या एका अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, चीन नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करू शकतो, ज्यामध्ये पारंपरिक शस्त्रेही वापरली जातील. यामुळे चीन अमेरिकेला लक्ष्य करण्याची धमकी देऊ शकतो.
सौजन्य अरीरंग न्यूज
१. पुढील मासात सॅन फ्रान्सिस्को येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग आणि जो बायडेन यांच्या अपेक्षित बैठकीच्या १ मास आधी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. प्रतिवर्ष प्रसिद्ध होणारा हा अहवाल म्हणजे चीनची वाढती सैन्य क्षमता मोजण्याची पेंटागॉनची पद्धत आहे.
२. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या मते, रशियाकडे ५ सहस्र ८८९ अण्वस्त्रे आहेत, अमेरिकेकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे आहेत, तर चीनकडे सध्या ५०० अण्वस्त्रे आहेत.
संपादकीय भूमिकाचीनची वाढती अण्वस्त्र क्षमता लक्षात घेता भारतात अल्प कालावधीत युद्धसज्ज होणे आवश्यक ! |