The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत
नवी देहली – देहलीच्या तीसहजारी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवनसिंह राजावत यांनी देहली पोलिसांना ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाच्या संपादकांचे भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी जप्त केलेली उपकरणे परत करण्याचा आदेश दिला. या वेळी न्यायमूर्ती राजावत यांनी, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकारांना मोकळेपणाने काम करू दिले नाही, तर लोकशाहीच्या मुळावर तो खोल आघात असेल’, असे लेखी निरीक्षण नोंदवले.
देहली पोलिसांनी गेल्या वर्षी भाजपचे नेते अमित मालवीय यांच्या तक्रारीवरून ‘वायर’च्या संपादकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. न्यायमूर्ती राजावत यांनी आदेशात म्हटले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्यामुळे संपादकांना काम करतांना अडचणी येत आहेत. देहली पोलिसांनी केलेली ही कारवाई घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
संपादकीय भूमिका
|