पुणे येथे साहाय्यक फौजदारास लाच घेतांना अटक !
पोलीस विभागाला लज्जास्पद !
पुणे – बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद न करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार सुनील जाधव याने ६० सहस्र रुपयांची मागणी केली होती. त्यातील २५ सहस्र रुपये लाच घेतांना जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदार आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये मुदतीमध्ये घराचे बांधकाम न केल्याचा वाद चालू होता.