अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सांगली – तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलीन हे मी ख्रिस्ती मुलीशी विवाह केला असून मी ख्रिस्ती असल्याचा मला अभिमान आहे; मात्र सनातन धर्म रोग आहे, असे उघडपणे म्हणतात, त्याला विरोध होत नाही. इस्रायलवर आक्रमण करणार्या ‘हमास’ संघटनेचे जिहादी आतंकवादी ६ ते ८ वर्षांच्या लहान बालकांना जिवंत जाळतात, तरुणींवर अत्याचार करतात, ते उदयनिधी स्टॅलीन यांच्यासारख्या अर्बन नक्षलवाद्यांना चुकीचे वाटत नाही, तर जगाला विश्वकल्याण-विश्वशांती शिकवणारा सनातन धर्म हा चुकीचा असून तो रोगासमान वाटतो. दुर्दैवाने १०० कोटी सनातनी हिंदू असलेल्या या देशात याला कुठेच विरोध झाला नाही. तरी या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ‘सनातन धर्मरक्षक’ बनावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.
या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई यांसह जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ असे १५० जण उपस्थित होते.
१. अर्बन नक्षलवाद हा लढा वैचारिक स्तरावरही असून तो अतिशय घातक आहे. लाखो लोकांची हत्याकांडे केलेला रशियाचा हुकूमशाह ‘स्टॅलीन’ ज्यांना आदर्श वाटतो, हिंदूंवर अत्याचार करणारा ‘तैमूर’ ज्यांना आदर्श वाटतो आणि अशांची नावे जाणीवपूर्वक मुलांना ठेवली जातात, यावरून त्यांचे आदर्श कोण आहेत ? तेच समोर येते.
२. सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’चे (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचे भाषण) गुन्हे नोंद करा’, असे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात ‘सर तनसे जुदा’ अशी घोषणा देणार्यांवर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे नोंद केले जात नाहीत, तर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर ‘हेट स्पीच’चे ३० गुन्हे नोंद केले जातात. याउलट ‘लव्ह जिहाद’चा कायदा करा’, अशी मागणी करणार्यांवर गुन्हा नोंद केला जातो, हे दुर्दैवी आहे. गुजरात दंगलप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सी.जे.पी.’ या संघटनेचे कार्यकर्ते हिंदुत्वनिष्ठांच्या सभांमध्ये जाऊन सभांचे ध्वनीमुद्रण करतात आणि पोलिसांकडे गुन्हा होण्यासाठी तक्रार देतात. यावरून अर्बन नक्षलवाद कशा प्रकारे कार्य करतो ? ते लक्षात येते.