लेडीज बारवरील धाडीत २४ जण कह्यात !
लेडीज बारवर बंदीच हवी !
पनवेल – शहरातील क्रेझी बॉईज या लेडीज बारवर पोलिसांनी घातलेल्या धाडीत अश्लील हावभाव आणि अंगविक्षेप करणार्या १२ महिला, कर्मचारी आणि ग्राहक अशा २४ जणांना कह्यात घेतले. येथील महिला गायिका अश्लील हावभाव करून व्यासपिठावरून खाली उतरून ग्राहकांशी शारीरिक लगट करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली होती.