Vijayadashmi : दसर्याला सरकारी कार्यालयात हळद-कुंकू न वापरता शस्त्रपूजन करा !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – विधानसभा, बहुमजली सरकारी इमारती आदींच्या ठिकाणी येत्या दसर्याला शस्त्रपूजन करतांना हळद-कुंकू यांसह कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर करू नये, असा आदेश कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून (Karnataka Congress Government) काढण्यात आला आहे. कार्यालयात किंवा मार्गिकेमध्ये यांचा वापर करू नये, असे या आदेशात म्हटले आहे.
शस्त्रपूजेच्या वेळी कार्यालय आणि मार्गिका यांमध्ये रसायनमिश्रित हानीकारक रंग वापरल्याने ते गालिच्यावर पडून अनेक महिने चिकटून रहातात. त्यामुळे गालिच्यांचे सौंदर्य नष्ट होते. याविषयी पूर्वीही अनेक आदेश देण्यात आले असूनही त्यांचे पालन न झाल्याने सरकारने हा आदेश पुन्हा दिला आहे. (पूर्वी आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही, हे लक्षात घेता सरकारचा आदेशच चुकीचा आहे, असेच लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|